देशभर मालवाहतूक ठप्प.
८ राज्यांतील ट्रकचालक संपावर नवीन ‘हिट अॅण्ड रन’ कायद्याला विरोध…

24 प्राईम न्यूज 2 Jan 2023 केंद्र सरकारच्या नवीन ‘हिट अॅण्ड रन’ कायद्याविरोधात देशभरातील ट्रक, टँकरचालकांनी दंड थोपटले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, हरयाणा, बिहार, राजस्थानसह आठ राज्यांत ट्रक, टँकरचालक संपावर गेले आहेत. महाराष्ट्रातही टँकरचालक संपावर गेल्याने पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आपल्या गाडीच्या तेलाच्या टाक्या फुल्ल करून घ्याव्यात, असे न आवाहन केले जात आहे.