गृहमंत्री फडणवीसांच्या काळात गुन्हेगारी वाढली.. –
-खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप…

24 प्राईम न्यूज 2 Jan 2023 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सातत्याने बदल्या केल्या जात आहेत. पोलिसांना पारदर्शकपणे काम करू दिले जात नाही. गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडण्यात देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीकादेखील सुप्रिया सुळेंनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.सायबर क्राईमचे विषय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतात. केंद्र सरकारने १५ दिवसांपूर्वीच गुन्हेविषयक नवीन विधेयक पारित केले आहे. यामध्ये फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आली आहे, असा दावादेखील सुप्रिया सुळे यांनी केला. राज्यात सायबर क्राईमचे प्रकार वाढलेले असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय करतात, असा सवालदेखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.