त्या १५ वर्षे दादांमुळे निवडून आल्या..
-रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा…

24 प्राईम न्यूज 2 Jan 2023 सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करणारे दोन्ही खासदार अजितदादांमुळेच निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. सुप्रिया सुळे गेली १५ वर्षे अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. दादा सोबत नाही म्हणून त्यांना मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असा दावा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीचाकणकर यांनी केला.
अजित पवारांनी २०२३ ला महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय विकासासाठी घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. अजित पवार यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे असेल, तर आम्हला काम करावे लागेल. आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या. १८ जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा आयोजित केला आहे, अशी माहितीदेखील चाकणकर यांनी दिली.