आंतरवालीचे प्रयोग पुन्हा नकोत! जरांगे पाटील..

24 प्राईम न्यूज 2 Jan 2023 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव मुंबईत शांतपणे येणार आहेत आणि शांतपणे परत जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनाही आमची विनंती आहे की राज्य सरकारने कोणाचीही वाहने अडवू नयेत. आंतरवालीचे प्रयोग करण्याचा पुन्हा प्रयत्न करू नये. नको त्या भानगडीत पडू नये. एखादे वाहन जरी अडवले तरी तिघांच्या दारात जाऊन लाखो मराठे बस मुंबईसह नागपूर, बारामती या ठिकाणी ज तिघांच्या दारात बसू. घराला वेढा दिला जाईलस्पष्ट इशारा मनोज जरांगे- पाटील यांनी दिला.