आता काँग्रेसही फुटणार.पुढील 30 दिवसात राज्यात मोठया घडामोडी.. . -अंजलीं दमानिया

24 प्राईम न्यूज 3 Jan 2023 पुढील ३० दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार असून जानेवारी महिन्यातच ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या आधी काँग्रेसही फुटेल. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा सोहळ्याच्या आधी महाराष्ट्रात या घडामोडी घडतील, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, पुढील काही दिवसात भाजप राज्यातील काँग्रेस पक्षालाही सुरूंग लावणार आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही. परिणामी आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. भाजप सर्वच पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात ओढून घेत असल्याचे बघून दुःख होते. हीच भाजप भ्रष्टाचाराविरोधात लढायची का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्यांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे हवे अशा नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्र फडणवीस मोठे करीत करीत असल्याची माझ्या मनात शंका आहे, असे वक्तव्यदेखील अंजली दमानिया यांनी केले.