पोलिस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ .आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..

अनीस खाटीक/धुळे
धुळे शहरातील पोलीस मुख्यालय येथे शहीद स्मारकासह अंतर्गत रस्त्यांची कामे,प्रवेशद्वार आदी कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. इतर प्रशासनिक सेवा वरील भांडवली खर्च व महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माणसाठी बांधकाम करणे या अंतर्गत सुमारे 4 कोटी 41 लाख कामाचे शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले धुळे शहरातील संपूर्ण विकास व्हावा म्हणून आ.फारुख शाह यांचे प्रयत्न असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा व विकास व्हावा म्हणून शासनाकडून करोडो रुपयांच्या निधी आणण्याचे काम आ.फारुख शाह यांनी केले आहे. त्यानंतर पोलीस बांधवांसाठी सुद्धा आ.फारुख शाह यांनी शासनाकडून चार कोटी 41 लाख रुपयाच्या निधी आणला आहे यात पोलीस मुख्यालय प्रवेशद्वार बांधणे तसेच पोलीस मुख्यालय कवांयत मैदान बैठक व्यवस्थेचे बांधकाम करणे ,मैदानात ध्वजस्तंभ उभारणे व त्याचे बांधकाम करणे व पोलीस मुख्यालय परिसरात शहीद स्मारकाचे सुशोभीकरणासह लँडस्केप बगीचा आवार भिंतीस बांधकाम करणे तसेच पोलीस मुख्यालयातील मल्टीपर्पज हॉलचे नूतनीकरण करणे व पोलीस मुख्यालयातील व परिसरातील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे या बाबींसाठी हा निधी वापरला जाणार आहे यासाठी पोलीस बॉईज यांनी आ.फारुख शाह यांना निवेदन देवून मागणी केली होती.त्या अनुषंगाने आ.फारुख शाह यांनी तात्काळ याची दखल घेत शासनाकडे व गृहीभागाकडे या कामासाठी पाठपुरावा करून निधी आणलेला आहे तसेच आ.फारुख शाह यांनी धुळे जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी स्वतःचे घर व्हावे म्हणून प्रस्ताव सादर केलेले असून ते सुद्धा लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे या कामासाठी धुळे जिल्हा पोलीस कर्मचारी,पोलीस बॉईज तर्फे आ.फारुख शाह यांचे आभार मानण्यात आलेले आहे.देविदास चौधरी निवृत्त पोलीस निरीक्षक यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास आर.आर.पाटील कार्यकारी अभियंता,धर्मेंद्र झाल्टे उपअभियंता,नासिर पठाण,अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस असो,बॉबी वाघ, रऊफ पठाण, सलीम शेठ शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग ,नगरसेवक अब्दुल गणी डॉलर ,डॉ. दीपश्री नाईक , मौलवी शकील, निजाम सय्यद ,कैसर अहमद,आसिफ शाह,प्यारेलाल पिंजारी,छोटू मच्छीवाले,हालीम शमसुद्दिन,इब्राहीम शेख,नजर पथान,नुरा शेख,अकिब अली,समीर मिर्झा,शहजाद मन्सुरी फातिमा अन्सारी मलेखा खाटीक, सुलेमान मलिक,रफिक शाह,परवेज शाह, स उ द आलं,मुजाही शेख,नाहीं शेख,फैसल अन्सारी आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस बॉईज आणि पोलीस सेवानिवृत्त असो.यांनी प्रयत्न केले.