ज्येष्ठांनी सल्लागाराच्या भूमिकेत राहावे-अजित पवार

24 प्राईम न्यूज 5 Jan 2023. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. त्याकरिता ज्येष्ठांनी नव्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. संधी मिळत नसल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेत वेगळा मार्ग निवडल्याचा पुनरुच्चारदेखील त्यांनी केला. नाशिकमध्ये गुरुवारी सुविचार गौरव सोहळ्यानिमित्त कालिदास कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास आपल्या शैलीत तुफान फटकेबाजी करीत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला. यावेळी व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.