मोदींची गॅरंटी खरी नाही.. -शरद पवार

24 प्राईम न्यूज 5 Jan 2023. भाजपने सत्ता हाती येण्याआधी अनेक घोषणा केल्या, परंतु सत्ता हातात आल्यावर जनतेची केवळ फसवणूकच केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. शहरी भागातील लोकांना घरे देऊ म्हणाले होते, तेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. जर्मनीत हिटलरच्या प्रचार यंत्रणेसारखी भाजपची प्रचार यंत्रणा आक्रमकपणे काम करते. त्यामुळे सर्वच थक्क होतात. मोदींची गॅरंटी खरी नाही हे जनतेच्याही आता लक्षात येऊ लागले आहे. लोकसभेच्या ४५० जागा जिंकू, असा दावा ते सतत करतात, पण दक्षिण भारतासह इतर राज्यात भाजप बळकट नाही. त्यामुळे ४५० जागा कशाच्या बळावर जिंकणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोर्दीसह भाजपवर निशाणा साधला..