बाहूटे येथे १७ शेळ्यांवर हिस्त्र प्राण्यांचा हल्ला ; १० ठार,७ जखमी

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा तालुक्यातील बाहूटे येथे खळ्यात बांधलेल्या १७ शेळ्यांवर हिस्त्र प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना दिनांक सात रोजी पहाटेचा सुमारास घडली,त्यात १० शेळ्या या ठार झाल्या तर ७ शेळ्या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाहुटे येथील शेतकरी सर्जेराव भागवत पाटील यांचा मालकीचा लहान मोठ्या १७ शेळ्या या गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळे शेजारील दत्त मंदिरासमोर वासुदेव दत्तू पाटील यांच्या खळ्यात बांधलेल्या होत्या.
दिनांक सात रोजी पहाटेचा सुमारास हिस्त्र प्राण्यांच्या कळपाने खळ्याला लावलेले तार कंपाउंड मध्ये घुसून शेळ्यांवर हल्ला चढविला.हल्ल्यात शेळ्यांचे ठिकठिकाणी लचके तोडल्याने अगोदर सात शेळ्या जागीच ठार झाल्या तर दहा शेळ्या गंभीर जखमी झाल्या होत्या,तद्नंतर तीन शेळ्या मरण पावल्याने असे एकूण दहा शेळ्या मृत होऊन सात शेळ्या गंभीरित्या जखमी झाल्या आहेत.पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख यांनी घटनास्थळी सदर सर्व मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा केला.यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, हेड कॉनस्टेबल नाना पवार, वनविभागाचे वनपाल वैशाली गायकवाड,वन मजूर जिजाबराव पाटील,संरक्षण मजूर गुरुदास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान सर्जेराव पाटील यांची परिस्थिती हलाखीची असुन शेळ्यांचे पालन करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते मात्र हिंस्र प्राण्यांनी त्यांचा सर्वच शेळ्यांवर हल्ला चढविल्याने त्यांचावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,शासनाने त्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.