पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी नवल चौधरी तर सरचिटणीस पदी गणेश क्षत्रिय..

पारोळा /प्रकाश पाटील
भाजपा जळगाव वसंत स्मृती
कार्यालयात झालेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत पारोळा युवा मोर्चा शहराध्यक्षपदी नगरसेवक नवल (भैय्या) चौधरी तर युवा मोर्चा सरचिटणीस पदी गणेश क्षत्रिय यांची जळगाव जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, जळगाव लोकसभा खासदार उन्मेष पाटील,जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी,एरंडोल-पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील,पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दिपक अनुष्ठान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण,पारोळा तालुकाध्यक्ष अनिल पाटील शहराध्यक्ष मनीष पाटील,जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, रेखाताई चौधरी,ॲड.कृतिकाताई आफ्रे,जितू गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
या वेळी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष इमरानभाई,तालुका उपाध्यक्ष अलीमभाई,ईश्वर ठाकूर,प्रसाद महाजन,अतुल मराठे,दिपक चौधरी आदी उपस्थित होते.