मतदारसंघात रस्ते सुधारणेसाठी २९० कोटींची मंजुरी…

0

पारोळा /प्रकाश पाटील

पारोळा आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात रस्ते सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

आज पावेतो प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य मार्ग,ग्रामीण मार्गासह शेतरस्त्यांचा कामांना आ. चिमणराव पाटील यांनी प्राधान्य देऊन त्या सुधारणेसाठी पाठपुरावा केला आहे,यात आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांचा सुधारणेसाठी ३५० कोटींपेक्षा जास्तचा निधी आमदार पाटील यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी खेचून आणला आहे.तसेच प्रामुख्याने दोन गावांना जोडणारे पूल, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहाखाली येणारे लहान मोठे पूल,मुख्य व गावांना जोडणारे रस्ते यांसह अनेक लोकाभिमुख कामांना आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजुरीसह निधी प्राप्त झाला आहे.त्यातील बरीचशी कामे पूर्णत्वास आली, काही कामे सुरु आहेत,तर काही कामे तांत्रिक मान्यतेसाठी शासन दरबारी प्रस्तावित आहेत. दरम्यान,नागरिकांचे दैनंदिन दळणवळणासह वाहतुकीस रस्त्यांअभावी गैरसोय होऊ नये, मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरावस्था ही बदलावी व दैनंदिन प्रवास हा सुखकर व्हावा ही आ. चिमणराव पाटील यांची संकल्पना आहे.सद्यस्थितीला मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे सुरु असून त्यातच आमदार पाटील यांनी मोठी भर म्हणून पारोळा-कजगांव -भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी निधी खेचून आणला आहे. दरम्यान पारोळा-कजगांव- भडगांव रोड तसा अनेक दशकांपासून दुरावस्थेमुळे चर्चेत राहिला आहे,वाहतूकदारांना येथे वाहन जोखीमेने हाताळावे लागत असल्याने हा रस्ता जणू खड्ड्यांचे माहेर घरच होता. दरम्यान निधी कमतरतेमुळे ह्या रस्त्याचा पूर्ण विकास होऊ शकला नाही मात्र रस्त्याचा सुधारणेसाठी आमदार पाटील हे सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत होते.अखेर या पाठपुराव्याला आता यश आले असून शासनाच्या ए.डी.बी.(Asian Development Bank) अंतर्गत पारोळा ते कजगांव ते भडगांव रस्त्याचा सुधारणेसाठी २९० कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असुन यात रस्त्याचे दहा मीटर रुंदीकरण, डांबरीकरण,मजबुतीकरण, काँक्रीटीकरण या कामांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!