मनीषा मराठे ने कुराश स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक..

अमळनेर /प्रतिनिधी
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित डी.आर.कन्याशाळेची विद्यार्थिनी मनीषा गणेश मराठे हिने १४ वर्षाखालील राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल अहमदनगर येथे आयोजित क्रीडा युवक सेवा संचलनालय (महाराष्ट्र राज्य) पुणे,अहमदनगर,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व महाराष्ट्र कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत मनीषा मराठे हिने १४ वर्षाखालील स्पर्धेत हे यश मिळवले असून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
तिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांच्या हस्ते स्पर्धेच्या ठिकाणी गौरविण्यात आले.पुढील स्पर्धा ११ ते १६ जानेवारी दरम्यान दिल्ली येथे पार पडणार आहेत.मनीषा मराठे हिच्या यशासाठी क्रीडा शिक्षिका आर.एस.सोनवणे व जे.व्ही बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल,मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,पर्यवेक्षक व्ही.एम.कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.