अमळनेरात हॉटेलात जेवण करण्याच्या वादातून चाकु हल्ला…. दोघना अटक.

अमळनेर/ प्रतिनिधि तालुक्यातील लोंढवे फाट्यावरअसलेल्या हॉटेल सर्वज्ञ येथे सुमारे पाच ते सहा जणांवर चाकू हल्ला झाला असून त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या बाबत वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील जानवे येथील सोनू पारधी व त्याचा मित्र अजय याने जेवण करण्यावरून झालेल्या वादातून वेटर व हॉटेल मालकाचा मुलगा अशा सुमारे पाच लोकांवर चाकूने हल्ला चढवला आहे. दरम्यान या सर्वांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे. या बाबत अमळनेर पोलीस पुढील तपास करीत असून दोन्ही आरोपी अटकेत असल्याचे समजते.