काका-पुतण्यांत वाक्युद्ध !
आमदार रोहित पवारांचा टोला; अजित पवार म्हणाले, बच्चा

24 प्राईम न्यूज 7Jan 2023 आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रोवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. यावरून रोहित पवार यांनी मराठी बाणा लढण्याचा असल्याचे सूचक द्विट केले होते. त्यानंतर शनिवारी या मुद्यावरून बोलताना रोहित पवार यांनी बारामती अॅग्रोमध्ये जर काही चुकीचे केले असते, तर मी अजित पवार यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलो असतो, असा टोला लगावला. यासोबतच अजित पवार गट आणि शिंदे गट आता कमळावर निवडणूक लढतील, असाही चिमटा काढला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार बच्चा आहे. त्यावर आमचे प्रवक्ते बोलतील, असे म्हटले. त्यामुळे आगामी काळात काका-पुतण्यात संघर्ष अटळ असल्याचे बोलले जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ईडीने ६ ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याअगोदर आमदार रोहित पवार यांनी ईडीच्याकारवाईमागे दोन बड्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता धाडीनंतर शनिवारी ■ बोलताना त्यांनी थेट अजित पवार गट आणि शिंदे • गटावर निशाणा साधला. सात-आठ दिवसांपूर्वी अजितदादा मित्रमंडळाचे कोण दिल्लीत गेले, हे ■ पाहणे महत्त्वाचे आहे. मी खरच चूक केली असती तर अजितदादां सोबत भाजपमध्ये जाऊन बसलो असतो, आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे.