मौलाना मुक्तार अहमद मदनी यांचे शुभहस्ते सर्व्हे क्र.४०४ येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे कामाचा शुभारंभ संपन्न..
ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच मी शहराचा विकास रथ पुढे नेऊ शकलो…. –आ.फारुख शाह

धुळे /अनीस खाटीक
धुळे:महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील सर्व्हे क्र.४०४

(सिराजुल उलूम मदरसा) येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे. या १ कोटी खर्चाच्या कामाचा शुभारंभ मौलाना मुक्तार अहमद मदनी यांचे शुभहस्ते संपन्न झाला.आ.फारुख शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मौलाना हाफिज हिफजुर रहेमान,मौलवी शकील,मौलाना शोएब मौलाना अब्दुल्ला, मौलाना जिया उर रहमान,मौलाना अन्वर उल हक,मौलाना अब्दुला ,मौलाना एकलाक,मौलाना हेलाल, मुफ्ती झिया उर,मौलाना रिझवान,मौलाना इर्शाद,मौलाना जमालुद्दिन,मौलाना मोहम्मद आरिफ,हाफिज एयाज अहमद,कारी काशीद अली ,सलीम शाह,नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक मुकतार अन्सारी,नगरसेवक आमिर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मौलवी शकील यांनी आ.फारुख शाह यांच्या विकास कामाचा आढावा मांडला.
सिराजुल उलूम मदरसा शहरातील नामांकित मदरसा असून याठिकाणी जवळ जवळ ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.सुमारे १ कोटी खर्चातून मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे,प्रवेशद्वार आणि इतर कामे केले जाणार आहेत.मदरसा सिराजुल उलूम येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना अब्दुला यांनी केले.मौलाना मुक्तार अहमद मदनी यांनी आशिर्वाद दुवा देवून कार्यक्रमाचा समारोप केला.