नॅशनल प्राथमिक उर्दू शाळा चोपडा येथे शाळास्तर विज्ञान प्रदर्शन.

फयाजोद्दीन शेख / एरंडोल ता. प्रतिनिधि द नॅशनल सोशल वेलफेअर सोसायटी संचालित नॅशनल प्राथमिक उर्दू शाळा चोपडा येथे शाळास्तर ( इयत्ता पहिली ते आठवी ) विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात

आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष मा. मो. हनीफ अब्दुल सत्तार होते सदर विज्ञान प्रदर्शना चे उद्घाटन मा. श्री हेमंत निकम साहेब ( मुख्याधिकारी साहेब नगर परिषद चोपडा.) यांचे हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन चे निरीक्षक म्हणून अब्दुल हक शेख अय्युब सर (मुख्याध्यापक मुस्तुफा अँगलो उर्दू हाई स्कूल अँड ज्यू. कॉलेज चोपडा) व असलम खान सरफराज खान सर ( पदवीधर शिक्षक जि. प. उर्दू शाळा चोपडा) है होते .. आलेले सर्व मान्यवर यांना पुष्पगुच्छ गुच्छ व शाल देऊन यांचा सत्कार करण्यात आला. सदर वेळी संस्था संचालक शेख सलीम शेख करीम , इब्राहिम बेग अरमान बेग ,हुसैन खान पठाण (नगरसेवक), जीशान शेख , हाफिज अली सय्यद ( मा. नायब तहसीलदार) नौमान काझी , डॉ. रफिक भाई , डॉ. वसीम खाटीक व आलेले सर्व पालक वर्ग, विद्यार्थ्यांचं उपस्थित विदयार्थ्यानी सादर केले मॉडेल ची कारिगिरी व पेशकश उत्कृष्ट पद्धतीने केल्याने आलेले सर्व प्रमुख पाहुणे, निरीक्षक व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे ,वर्ग शिक्षकांचे कौतुक केले . ग्रुप प्रमाणे प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली . सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी करणे साठी मुख्याध्यापक अब्दुल बसीद अब्दुल लियाकत व सर्व शिक्षकांचे परिश्रम लाभले…….