जळगाव अप्पर पोलीस अधीक्षकपदी अशोक नखाते. – जळगाव शहरातील मुस्लिम व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन केले स्वागत

फयाजोद्दीन शेख/ एरंडोल तालुका प्रतिनिधि
जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांनी या पदाचा पदभार स्वीकारला असून
सध्या त्यांच्याकडे पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी आहे.
त्यानी आपले कर्तव्य करण्यास चांगली सुरुवात केली.
जळगाव शहरातील मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
कब्रस्थान मधून ७ महिन्यांच्या बालकाचा मृतदेह बेपत्ता झाल्याची लेखी तक्रार पालकाने देऊन सुद्धा कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्या ची तक्रार या शिष्टमंडळाने लेखी स्वरूपात करताच त्यांनी स्वत: पी आय ला फोन करून कारवाईचे आदेश दिले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. म्हणून अपर पोलीस अधीक्षकांचे आभार या शिष्टमंडळाने मानले
या सामाजिक कार्य कर्त्यांचा होता समावेश
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे स्वागत व सत्कार कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, कादरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारुक कादरी, ए यु शिकलगर फाऊंडेशन अध्यक्ष अन्वर खान, ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह व ताहेर शेख तसेच शिकलगार बिरादरी चे मुजाहिद खान यांनी केले.