मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित,

24 प्राईम न्यूज 10 Jan 2023. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला 2023 सालासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शमीला मंगळवारी (9 जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन पुरस्कार मिळालेला शमी हा 58 वा क्रिकेटपटू आहे. यामध्ये 12 महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तब्बल दोन वर्षांनंतर एका क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. शेवटच्या वेळी शिखर धवनला 2021 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. अर्जुन पुरस्कार मिळवणारे सलीम दुर्रानी हे पहिले क्रिकेटपटू आहेत. 1961 मध्ये त्याला सन्मानित करण्यात आले होते. शमीने यावर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक 24 विकेट घेत टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला, पण संघाच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले. शमीला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर संघ रचनेत बदल झाला आणि शमीला स्थान मिळाले. त्यानंतर त्याने कहर केला आणि संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.