११ पैकी ९ दोषी बेपत्ता बिल्कीस बानो प्रकरण..

24 प्राईम न्यूज 10 Jan 2023.
बिल्किस बानो सामूहिक बलात्कारप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ११ दोषींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द ठरवला. तसेच या सर्व गुन्हेगारांना २ आठवड्यांच्या आत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत, परंतु ११ दोषीपैकी ९ दोषी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता दोषींना पुन्हा शोधून काढत तुरुंगात पाठवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गुजरातमधील रंधीकपूर आणि सिंगवेद या दोन गावांमध्ये ११ दोर्षीपैकी ९ दोषी राहतात, पण हे दोषी घरी वास्तव्यास नसल्याचा दावा करण्यात येत आहे.