वायरमन च्या च हेऱ्यावरील काही भाग कापल्या गेल्याने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश..

0

अमळनेर /प्रतिनिधि संक्रांतीचा सण जवळ आल्याने पतंग उडवणाऱ्यांच्या नायलॉन मांजामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. रत्नापिंप्री येथील एका वायरमन च्या डोळ्यावरील भाग व नाकाचा भाग कापला गेला आहे.
संक्रांतीचा सण जवळ आला मोठे दुकांनदार ते गल्लीतील टपऱ्या व किराणा दुकानांवर पतंग विक्री होते. यामुळे मुले सायंकाळी पतंग उडवत असतात. मान्यता नसलेला आणि नागरिकांच्या जीवाला घातक ठरणारा नायलॉन मांजा बिनधास्तपणे विक्री होत असल्याने पतंग कटाकाटी साठी त्याचा वापर केला जात आहे. काही मुले धाब्यावर पतंग उडवतात त्यामुळे पक्ष्यानाही धोका पोहचतो. ८ रोजी सायंकाळी रत्नपिंप्री येथील वायरमन पंकज देवराम पाटील हे मोटरसायकलने ड्युटी आटोपून अमळनेर येत असताना पैलाड भागातील काही मुले रस्त्यावरच पतंग उडवत होते. पतंग अडकल्याने रस्त्यात नायलॉन मांजा आडवा आला. धागा दिसत नसल्याने तो पंकज च्या डोळ्याजवळ लागल्याने डोळ्याजवळ आणि नाकावर कापले गेले. धागा थोडा खाली आला असता तर गळा कापला जाऊन जीवावर बेतले असते. पंकज सध्या दवाखान्यात उपचार घेत आहे.
पालिकेच्या राध्येश्याम अग्रवाल ,जगदीश बिऱ्हाडे ,सुरेश चव्हाण ,जयदीप गजरे यांनी विविध दुकांनवर धाडी टाकून नायलॉन मांजाच्या १२ रहाटी जप्त केल्या आहेत. एका महिलेने पालिकेच्या पथकाला पाहताच दरवाजा लावून घेतला व नायलॉन मांजाचा साठा लपवून ठेवला फक्त तीन रहाटी काढून दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

एक विशेष पथक नेमून बंदी असलेल्या नायलॉन मांजाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे व कारवाईचे आदेश दिले आहेत. पालकांनी देखील आपल्या मुलांना याबाबत सूचना द्याव्यात. घंटा गाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल- प्रशांत सरोदे ,मुख्याधिकारी ,नगरपरिषद ,अमळनेर

पोलिसांचे फिरते पथक नेमले असून केले जातील. तर रस्त्यात पतंग उडवणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल.दुकानदारांना नोटिसा देण्याचे सांगण्यात आले आहे – विजय शिंदे ,पोलीस निरीक्षक ,अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!