अमळनेरात बागवान जमातीचा झाला जिल्हास्तरीय सामूहिक विवाह सोहळा..

अमळनेर/प्रतिनिधि
हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत झाली 15 जोडपी झाली विवाहबद्ध
अमळनेर येथील बागवान जमातीचा 22 वा.जिल्हास्तरीय सामूहिक विवाह सोहळा अमळनेरात उत्साहात पार पडला, यावेळी हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत 15 जोडपी विवाहबद्ध झाली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती त्यांनी वायफळ खर्चाला आळा घालण्यासाठी सामूहिक विवाह ही काळाची गरज असून बागवान जमात नियमितपणे हा उपक्रम राबवित असल्याने या जमातीचे तोंडभरून कौतुक केले व नवीन विवाहबद्ध झालेल्या नवदाम्पत्याना शुभेच्छा देत या समाजासाठी शादिखाना मंजूर करण्याची ग्वाही दिली.दि 7 जानेवारी रोजी बागवान जमाअत हॉल,इजतेमा नगर,जपानजीन येथे हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी संपुर्ण जिल्हाभरासह आजूबाजूच्या जिल्ह्यातुनही असंख महिलाव पुरुष दाखल झाले होते,आयोजकांनी उत्तम व्यवस्था सर्वांची ठेवली होती,मोठ्या आनंदात व शांततेत हा सामूहिक विवाह सोहळा पार पडला,विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च आयोजक बागवान जमाअत पंच कमिटी यांनी उचलला.विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पंच कमिटीचे अध्यक्ष हाजी सलीम बाबूलाल बागवान,उपाध्यक्ष हाशिम मो.हनिफ बागवान तसेच सदस्य गुलाम रसूल सांडू बागवान,नूरमोहंमद फकीरमोहंद बागवान,खजिनदार-राजमोह मंद हसन बागवान,अ.रहीम अ. करीम बागवान,सचिव-डॉ.हा.रईस हा.अ. सत्तार बागवान,उपसचिव-समद जुम्मा बागवान,मो.अलताफ पिरन बागवान,मो.शफी चांद बागवान यासह समाजबांधवानी परिश्रम घेतले.
यावेळी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपुत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पंकज साळी,जुनेद शेख यासह पदाधिकारी उपस्थित होते.