नवीन वाहन कायदा हिट अँण्ड रन कायदा विरुद्ध निषेध… . –वाहतूक चालक मालक संघटना दोंडाईचा

दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख
दोंडाईचा: सर्व वाहतूक चालक मालक संघटना दोंडाईचा यांच्या वतीने नायब तहसीलदार निवेदन केंद्र सरकारचा वाहन चालकांविरुद्धचा काळा कायदा रद्द करावा, अशी मागणी सर्व वाहतूक चालक मालक संघटना दोंडाईचा तर्फे आज निवेदन देण्यात आला. तसेच मा. नायब तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आले. याबाबत तहसीलदार दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने नवीन पारीत केलेल्या कायद्यामध्ये अपघात केल्यास वाहन चालकास दहा वर्षांची शिक्षा आणि ७ लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. जर रोजंदारीवर काम करणाऱ्या वाहन चालकाकडून अपघात झाल्यास हा वाहन चालक ७ लाख कोठून आणले? कोणताही वाहन चालक जाणून बुजुन अपघात करीत नाही. रस्त्यांवर बरेचसे अपघात हे मोकाट फिरणारे गुरे, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होतात. अशावेळी सर्व अपघातास ट्रक चालकास जबाबदार ठरविता येणार नाही. तसेच वाहन चालकांचे आंदोलन अधिककाळ चालल्यास जिवनावश्यक वस्तुंचे भाव वाढतील. त्यामुळे केंद्र शासनाचा हा काळा कायदा रद्द करावा, अशी मागणी वाहतूक चालक मालक संघटना दोंडाईचा यांच्या वतीने व पोपट शेठ, प्रकाश सिंदी, जुम्मा शेख, साबीर शेख, सलीम शेख, बागुल नाना, अशोक मराठे, समाधान पाटील, अशिक शेख , सलीम शेख, हिरलाल कोळी, विनोद जाधव, मोहसीन सैय्यद, आवेश शेख, बबलु भाई, बापु कोळी, कैलास गुरव, प्रकाश कोळी, दिलीप शेळके, गोटु राजपूत, प्रविण भावसार, जहुर शेख, कलीम शेख, जाकीर मान्यार, संतोष पाटील,
आदीं उपस्थित होते.