सहाय्यक धर्मदाय आयुक्त पदावर
कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात यावी..
नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे पालकमंत्र्यांना निवेदन…

नंदुरबार/प्रतिनिधि नंदुरबार जिल्ह्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्त पदावर कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून सहाय्यक धर्मदाय आयुक्त नंदुरबार विभाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात अपुर्या कर्मचार्यांची तात्काळ नियुक्ती व्हावी. नंदुरबार जिल्हा बहुल आदिवासी जिल्हा व मागासवर्गीय जिल्हा असून अनेक लोक संस्था नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी व ऑडीट व चेंज रिपोर्ट करणेकामी दोन वर्षापासून अनेक लोकांचे कामे प्रलंबित आहेत. म्हणून मा.ना.अनिल भाईदास पाटील साो, नंदुरबार जिल्हा पालकमंत्री यांनी नंदुरबार जिल्ह्यात सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांची तात्काळ नियुक्ती होणेस यावी, जेणेकरुन जे लोकांचे कामे पेंडींग व येणे-जाण्याचा खर्च व वेळ वाया जाणार नाही. धुळे येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अतिरिक्त चार्ज असल्याने ते महिन्यात एक ते दोनवेळा नंदुरबारला येतात. म्हणून येथे कायम स्वरुपी धर्मदाय आयुक्त व कमी असलेले कर्मचारर्यांची तात्काळ नियुक्ती व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा सरचिटणीस नासिर बागवान, सामाजिक कार्यकर्ते हाजी शब्बीर पहेलवान, अमळनेर राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल अजीज, नजीर बागवान, अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.