सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर! खुद्द शिंदेंचा गौप्यस्फोट, पण काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात !

24 प्राईम न्यूज 18 Jan 2023. आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह मला पक्षात येण्याविषयो भाजपकडून ऑफर आल्याचा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी केला. भाजपच्या या डबल ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. सुशीलकुमार शिंद है अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मला भाजपकडून ज्यांनी ऑफर दिली आहे तो मोठा माणूस आहे. माझा दोनदा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असे म्हणतात. हे कसे शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण, तारुण्य गेले, तिला सोडणे अशक्य आहे