मायग्रेन का होतो?
वाचा लक्षणे आणि उपाय..

24 प्राईम न्यूज 18 Jan 2023
मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयात होतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हा त्रास उद्भवतो, तर काहींना अनुवांशिकतेमुळेदेखील याचा त्रास होतो. हार्मोन्समध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे आणि असंतुलनामुळे मायग्रेनचा त्रास होण्यास सुरुवात होते. तसेच पुरुषांच्या तुलनेपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मायग्रेन कशामुळे होतो? याची लक्षणे काय असतात ? यावर काय उपाय आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मायग्रेन कशामुळे होतो?
मायग्रेनची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे त्रास होण्यास सुरुवात होते. कोणत्याही पदार्थाची अॅलर्जी, कमी झोप, थकवा, मानसिक तणाव, काही औषधांचे सातत्याने सेवन, वारंवार उपवास करणे, जेवणाची वेळ अनियमित असणे, हृदयविकार, ब्लड प्रेशर या कारणांमुळे मायग्रेनचा त्रास होतो.
मायग्रेनची लक्षणे कोणती मायग्रेनच्या त्रासात डोकेदुखीसोबत डोळ्यासमोर अंधारी येते, तसेच डोळे दुखतात. पूर्ण डोके किंवा अर्धे डोके दुखते.
मोठा आवाज आणि प्रखर प्रकाशाचा त्रास होतो.
भूक कमी लागणे, घाम येणे, थकवा येणे, मळमळणे,
उलट्या होणे हे त्रासदेखील होतात मायग्रेनवर घरगुती उपाय
मोहरीच्या तेलाचे काही थेंब नाकात सोडावेत, यामुळे
मायग्रेनचा त्रास कमी होतो.दररोज रिकाम्या पोटी एक सफरचंद खावे. हा प्रयोग काही दिवस केल्याने डोकेदुखी पासून सुटका होते.