मुंबईतील मराठा मोर्चा टाळावा-एकनाथ शिंदे

24 प्राईम न्यूज 20 Jan 2023
राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे. त्यामुळे मराठा समाजाने मुंबईतील मोर्चा टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना शुक्रवारी केले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक मुंबईत दाखल होतील अशी भीती सरकारला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला आंदोलन टाळण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत. ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहोत, हा शब्द आम्ही दिला आहे. सरकार सकारात्मक असताना आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्यापेक्षा सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका जरांगे-पाटलांनी घेतली पाहिजे, असे शिंदे म्हणाले.