जरांगेंना मुंबईत
नो एण्ट्री..
मात्र मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम..

0

24 प्राईम न्यूज 26 Jan 2023. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे- पाटील यांचा ताफा पुण्याहून नवी मुंबईच्या दिशेने निघाला असतानाच, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलणी फिस्कटल्यानंतर मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांना मुंबईत ‘नो एण्ट्री’ केली आहे. मुंबई पोलिसांनी पत्र लिहून आझाद मैदानावरील उपोषण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

मात्र जरांगे-पाटील मुंबईतच उपोषणावर ठाम असून त्यांनी मुंबई पोलिसांनी सुचवलेला खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव धुडकावला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांचा ताफा लवकरच नवी मुंबईत पोहोचणार आहे. त्यातच आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची मराठा आंदोलकांना सामावण्याची क्षमता नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलिसांनी

मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-२९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानाचा प्रस्ताव सुचवला आहे. मुंबईतील आझाद मैदान हे ५ ते ७ हजार लोक मावतील, एवढेच असून शिवाजी पार्क मैदानावर न्यायालयीन आदेशाचे बंधन आहे. या मुळेआपण मुंबईत आंदोलन करण्याऐवजी नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांनी दिलेला प्रस्ताव मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी धुडकावला आहे.

खारघरचे सेंट्रल पार्क मैदान २९० एकरावर वसले असून आरक्षणासाठी निघालेले लाखोंच्या संख्येने येणारे आंदोलक त्यात सामावू शकतील. शिवाय मुंबईकरांचे हाल होणार नाहीत, असे मत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले होते. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!