अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिच्यावर केला अत्याचार…

0

अमळनेर/ प्रतिनिधि अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
चोपडा येथील चुंचाळे येथील ज्ञानेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी ) वय ४२ याने २६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी एका आठ वर्षांची बालिका तिच्या भावासोबत खेळत असताना तिला तंबाखूची पुडी आणण्याच्या बहाण्याने बोलावून तिला व स्वतः विवस्त्र होऊन तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार केला. त्याचवेळी आरोपी ज्ञानेश्वर याचा मुलगा घरी आला आणि दरवाजा ठोठाऊ लागला. आरोपीने त्यावेळी पीडितेच्या तोंडावर हात ठेवला. मात्र मुलगा जोरात दरवाजा ठोठाऊ लागल्याने त्याने दरवाजा उघडला ही संधी साधत पीडितेने तेथून पळ काढला. आणि आपल्या आजीला हकीकत सांगितली. आजीने तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली होती. सहाययक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी जलद तपास करून अवघ्या महिन्यात दोषारोप पत्र दाखल केले.
या संवेदनशील घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असल्यामुळे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सरकारी वकील ऍड किशोर बागुल याना विशेष पत्र देऊन खटला जलद चालवण्याची मागणी केली होती. त्यावर ऍड बागुल यांनी न्यायालयला पत्र देऊन विनंती केली. न्या पी आर चौधरी यांनी दखल घेत खटला वेगात चालवला. अवघ्या पाच महिन्यात निकाल दिला.

या खटल्यात सरकारी वकील ऍड किशोर बागुल (मंगरुळकर) यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. न्या पी आर चौधरी यांनी फिर्यादी ,पीडिता ,वैद्यकीय अधिकारी व तपासाधिकारी संतोष चव्हाण यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी ज्ञानेश्वर यास बालकांच्या लैंगिक शोषण कायदा २०१२ च्या कलम ४ नुसार २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा ,कलम ८ प्रमाणे ५ वर्षे सक्षम कारावास , कलम १२ प्रमाणे १ वर्षे शिक्षा सुनावली. घटनेपासून आरोपी जिल्हा कारागृहातच होता. पैरवी अधिकारी म्हणून सहाययक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे , हेडकॉन्स्टेबल हिरालाल पाटील , कॉन्स्टेबल सतीश भोई , राहुल रणधीर , नितीन कापडणे यांनी काम पाहिले.

न्यायाधीशांनी पीडितेची साक्ष न्याय कक्षात न घेता तिची भीती काढण्यासाठी स्वतःच्या चेंबर मध्ये काळे कोट काढून घेतली. सरकारी वकील व आरोपीचे वकील यांचेही काळे कोट काढण्यात आले होते. तिला मनातली भीती काढत तिच्या आई समक्ष पोस्को कायद्यांतर्गत पीडितेची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी दोन महिला वकील देखील हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!