माजिद भाई अन्सारी यांची अल्पसंख्यांक सेल च्या धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी निवळ.. -इर्शाद जहागिरदार यानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…

धुळे/अनिस खाटीक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्या विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस आलियास नाईकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांच्या मान्यतेने श्री. माजिद भाई अन्सारी यांची अल्पसंख्यांक सेल च्या धुळे शहर जिल्हाध्यक्ष पदी धुळे शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे. सेलच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी श्री. माजिद अन्सारी यांचे सहकार्य निश्चित लाभेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ धुळे शहर सरचिटणीस एजाज दादा खाटीक युवक प्रदेश सचिव निखिल पाटील सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुरेश अहिरे सोशल मीडिया प्रदेश सचिव समीर खान ओबीसी धुळे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी ज्ञानेश्वर पाटील धुळे शहर सोशल मीडिया अध्यक्ष सोहेल काजी एजाज शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आयुष काकडे व शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..