दंगलीत पैलवानांनी दाखवल्या अप्रतिम चाली, जाणून घ्या कोण जिंकले कोण हरले.

0

अमळनेर /प्रतिनिधि. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व अमळनेर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी उपविजेता महेंद्र गायकवाड याने जम्मू केसरी निसार डोडा याला चित करत विजय मिळवला. महाराष्ट्रातून आलेल्या पैलवानांच्या ८६ कुस्त्या झाल्या.
अमळनेर येथील खड्डा जीन मध्ये मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ठेक्याच्या ३५ कुस्त्यांमध्ये ऋषिकेश पाटील ,निजामअली शेख , पवन शिंपी , शुभम शिंदे ,प्रतीक पाटील, विशाल महाजन यांनी कुस्ती स्पर्धा जिंकली. तसेच खडी जोड च्या ५० कुस्त्या घेण्यात आल्यात. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील ,उद्योगपती सरजु गोकलानी , मंगळग्रह मंदिर संस्थान अध्यक्ष दिगंबर महाले , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील , जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव सुनील देशमुख , तालुका क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी , पैलवान भानुदास विसावे(धरणगाव) , जितेंद्र जैन , महेंद्र बोरसे , भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील , शिवाजी दाजभाऊ ,सुनील वाघ ,संजय पाटील,मुख्तार खाटीक ,एल टी पाटील,संजय महाजन (एरंडोल ),बंडू जैन , अनिल शिसोदे हजर होते. पंच म्हणून तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळू पाटील ,माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील ,पैलवान संजय भिला पाटील ,माजी नगरसेवक प्रताप शिंपी ,रावसाहेब पैलवान,शब्बीर पैलवान ,भरत पवार यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन गोरख पाटील(धुळे) व शिबी पानसरे (अहमदनगर) यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठीप्रवीण पाटील ,प्रशांत पाटील ,अलोक सोनवणे ,जयेश पाटील ,विक्की सोनवणे ,अमोल चौधरी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!