मला सरकार मध्ये ठेवायचे की नाही पक्षाने ठरवावे ! भुजबळ यांच्या वक्तव्याने महायुतीत अस्वस्थता

24 प्राईम न्यूज 30 Jan 2023
मला सरकारमध्ये का ठेवायचे की नाही हे माझ्या पक्षाने ठरवावे, मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही प चिंता नाही. ओबीसी प्रश्नाचे य दुःख आणि संताप आहे. नी त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून, मी एकटा नाही. माझ्या मागे ओबीसी समाज आहे. लाखो लोक आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केल्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. त्याला आमचा विरोध कधीच नव्हता.पण त्यांना ओबीसीत कशाला घुसवत आहात. त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, हे आता थांबवा, अशी स्पष्ट भूमिकाही छगन भुजबळ यांनी सोमवारी मांडली.