राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात स्हेनसंमेलन व गुणगौरव सोहळा..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात वसंतोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याचे उद्घाटन प्रा.डॉ.जी. एच.उस्मानी क.ब.चौ.उ.म.वि. कवी व प्रसिद्ध उद्बबोधक यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्हि. आर.पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक भानुदास वामनराव मोरे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेस पूजन, माल्यार्पण व वृक्षास जलार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी आदर्श शिक्षक,प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदी पदोन्नती तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्यानंतर उद्घाटक प्रा.डॉ. जी.एच.उस्मानी यांनी उर्दू गझल व शेरोशायरीने कार्यक्रमात रंगत आणून महाविद्यालयाच्या चढता आलेख व प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी विद्यार्थ्यांनी एकल नृत्य,नाटिका,मराठी व हिंदी गीते सादर करून स्नेहसंमेलनात रंगत आणून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. व्हि.आर.पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत संस्थेचे अध्यक्ष,संचालक मंडळ यांचा प्रेरणेने व मार्गदर्शनाने तसेच सर्वांचा सहभागाने भविष्यात महाविद्यालयाची अजून प्रगती व चढता आलेख कसा उंचावेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक स्नेहसंमेलन अध्यक्ष प्रा.एस.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.ए.ए.मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.एस. व्हि.चव्हाण यांनी मानले.
दरम्यान,दुपारच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन रिना पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संचालिका तनुजा मोरे, संचालिका रोहिणी मोरे उपस्थित आदी होते.स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.वसंतराव मोरे,सचिव पराग मोरे,संचालक ॲड.रोहन मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपप्राचार्य डॉ.एस.बी.भावसार, डॉ.जी.पी.बोरसे,डॉ. ए.एम. पाटील,डॉ.वंदना पाटील,प्रा.पी. पी.पाटील,प्रा.एस.डी.पाटील, संजय मोरे,चंद्रकांत निकम, विद्यार्थी परिषदेचे सदस्य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.