धुळे शहरातील हजार खोली येथील व्हाईट हाऊस ग्रुप बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातील फलकाचे अनावरण लोकसंग्राम चे युवा नेते श्री तेजस आप्पा गोटे यांच्या हस्ते संपन्न..

धुळे/प्रतिनिधि धुळे शहरातील हजार खोली येथील व्हाईट हाऊस ग्रुप बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयातील फलकाचे अनावरण लोकसंग्राम चे युवा नेते श्री तेजस आप्पा गोटे यांच्या हस्ते संपन्न झाले
आज दिनांक २९/१/२०२४ रोजी गेल्या ४ ते ५ वर्षापासून स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्था व्हाईट हाऊस ग्रुपच्या कार्यालयातील फलकाच्या अनावरण वेळी ग्रुपचे सेक्रेटरी तथा ज्येष्ठ सदस्य अकबर अली याकूब अली सय्यद सर यांनी प्रास्ताविक करीत असताना सदर संस्थेच्या कार्यप्रणाली संदर्भात माहिती देताना सांगितले की १५ सदस्यांनी मिळून गेल्या चार ते पाच वर्षापासून सदर संस्थेची सुरुवात करण्यात आली असून संस्थेच्या माध्यमातून दररोज सायंकाळी संस्थेचे सर्व सदस्य ६ ते ८ या वेळेत उपस्थित असतात व सायंकाळी ६ नंतर एकत्रित येऊन हजार खोली परिसरातील तसेच धुळे शहरातील अल्पसंख्यांक गोरगरीब व सर्व बहुजन विविध जाती धर्मातील लोकांचे दैनंदिन जीवनाशी निगडित कार्यात त्यांना सहकार्य करणे व त्यासाठी सदर संस्थेचे अध्यक्ष रफिक भाई यांनी संस्थेसाठी कार्यालयास जागा उपलब्ध करून दिल्यामुळे संस्था व धुळे शहरातील नागरिकांच्या समस्या निवारणामुळे त्यांच्या मधील एक निःपक्षपाती नाते प्रस्तापित होउन सर्वधर्म सौहार्द – एकतामय स्वरूपाचा संदेश सर्व धुळे शहरात एक आगळ्यावेगळ्या वातावरण निर्मितीची नांदीच जणु ठरीत आहे. तसेच माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती धर्मातील लोकांना संस्थेच्या माध्यमातून धुळे शहरातील सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रामाणिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत व येथून पुढेही समाज उपयोगी कार्य करण्याची ग्वाही देत आज कार्यालयातील फलकाच्या अनावरणास उपस्थित झाल्याने श्री तेजस अप्पा गोटे व श्री विजय वाघ, डॉ संजय पिंगळे, अविनाश लोकरे, मनोज वाल्हे, पिंटू ठाकूर, प्रकाश महानोर, मयुर खैरनार आदी लोकसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले व आनंद व्यक्त केला
तसेच संस्थेचे जॉईन सेक्रेटरी सलीम भाई शेख यांनी देखील संस्थेच्या कार्यप्रणालीची माहिती देत उपस्थित त्यांचे आभार व्यक्त केले व संस्थेतील एका सदस्याचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस साजरा करीत उपस्थितांनी त्यांचे सर्वांनु मते शुभेच्छा देण्यात आल्या
याप्रसंगी व्हाईट हाऊस ग्रुप बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष- रफिक शेख दादा मिया, उपाध्यक्ष रमेश पाटील, सेक्रेटरी -अकबर अली याकूब अली सय्यद सर, सलीम कालु शेख, के एम पठाण,अताब घराडीया, मंजर अली खतीब, शरिफोद्दीन शेख, आसिफ पठाण, शकील मिर्झा, अल्ताफ मंसुरी, नासीरअली सय्यद, दिलदार पठाण, खुर्शीद शेख, डॉ मो. शहाब हनीफ आदी तसेच लल्लू सेठ नगरसेवक, मुख्तार मच्छी नगरसेवक, जावेद मिस्त्री व व्हाईट हाऊस ग्रुप चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते अशी माहिती सेक्रेटरी -अकबर अली याकूब अली सय्यद सर यांनी दिली व लोकसंग्रामचे अविनाश लोकरे यांनी प्रसिध्द केली