विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच नैतिक शिक्षण द्यावे – विजयरत्न सुंदरसुरीजी महाराज.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच वर्गात पंधरा मिनिटे नैतिक शिक्षण द्यावे असे पद्मभूषण सन्मानित आचार्य विजयरत्न सुंदरसुरीजी महाराज यांनी मार्गदर्शनात सांगितले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासह धार्मिक, सांस्कृतिक प्रवाहात टिकून राहावे यासाठी येथील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये जैन पंथीय पूज्यपाद आचार्य विजयरत्न सुंदरसुरीजी महाराज यांच्या जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराजांसोबत साधू परम सुंदर सुरीजी,युगसुंदरसुरीजी,साध्वी संवेगनिधी श्रीजी व महाराजांचे इतर शिष्य उपस्थित होते.
प्रवचनात महाराजांनी नैतिक मूल्य व दानधर्म याची शिकवण देण्याबाबत संबोधले तसेच शाळेला व शिक्षकांना टिचिंग, टचिंग आणि टर्निंग या तीन बाबीवर संबोधत शिक्षण हे बौद्धिक न ठेवता आत्मिक व हृदयाला स्पर्श होईल असे शिकवावे हा संदेश दिला.या प्रवचनाचे आयोजन संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा यांनी केले होते.दरम्यान,महाराजांना भारत सरकार द्वारा पद्मभूषण सन्मानित करण्यात आले आहे,गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव ही आहे तसेच अनेक प्रोत्साहनार्थक पुस्तकांचे लेखन ही त्यांनी केले आहे.
यावेळी कार्यक्रमात शहरातील वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ,श्री १०८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर संघ,श्री क.द.ओ जैन संघ तर अमळनेर जैन संघांसह आदींचे नियोजन व मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्या शोभा सोनी, ऍडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.