पारोळा श्री शिवाजी हायस्कूलात ध्वजारोहण..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येथील शिवाजी हायस्कूल मध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनोराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील,संस्थेचे संचालक अशोक पाटील,मुरलीधर नावरकर,माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील,माजी पोलीस पाटील रमेश चौधरी,व्यापारी अरुण वाणी,दिलीप मालपुरे,साहेबराव भोई,दिलीप शिरूडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. बी.चौधरी,जी.बी.पाटील,जी.आर. वाणी,बी.यु.महाजन,बी.डी. पाटील,आर.यु.बोरसे,देवराम जाधव,रंगराव पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.