अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित बांधकामाचे भूमिपूजन संपन्न..

अमळनेर/प्रतिनिधि. सन्माननीय उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते आज अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या उर्वरित बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. संकुलास ४ कोटी रुपये मंजूर झाले असून सध्या १ कोटींच्या प्राप्त निधीतून या अद्ययावत अशा क्रीडासंकुलात ४०० मी. रनिंग ट्रॅक, नवीन बास्केटबॉल मैदान, स्केटिंग रिंग, जॉगिंग ट्रॅक व हॉलीबॉल मैदानाचा समावेश आहे. त्याबरोबरच येथील बहुउद्देशीय हॉलचे नूतनीकरणही करण्यात येत आहे.
या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अमळनेरमधील क्रीडापटुंना सरावासाठी एक हक्काची जागा प्राप्त होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे बांधकाम करणाऱ्या मजुरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.