शासन भेट अंतर्गत अखिल भारतीय ग्राहक पंचायतची अमळनेर स्टेट बँकेला भेट..

अमळनेर/प्रतिनिधि दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे सदस्यांनी स्टेट बँकेचे व्यवस्थापक श्री ठाकरे साहेब यांची भेट घेतली व ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी बाबत निवेदन त्यांना देण्यात आले .सदर निवेदनात आपल्या अमळनेर येथील शाखेत बँक कर्मचाऱ्याकडून सर्व ग्राहकांना विशेषतः जेष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी याबद्दल निवेदन देण्यात आले व इतर तक्रारीं बाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली.आपण ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे बाबत सर्वतोपरी सहकार्य करू व सर्व ग्राहकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी या करिता आपण विशेष प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी नूतन अध्यक्षा सौ.स्मिता चंद्रात्रे, ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या एडवोकेट सौ.भारती अग्रवाल, तालुका संघटक सौ. ज्योती भावसार,जिल्हा सह संघटक मकसूद बोहरी, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख विजय शुक्ल व जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख श्री सुनील वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती पीआरओ जयंतीलाल वानखेडे कळवितात.