सर्व महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार – जयश्री पाटील…

अमळनेर /प्रतिनिधि.

अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था व माजी जिप सदस्या जयश्री पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 जानेवारी रोजी अमळनेर शहरातील लैंगिक कामगार महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आलाअमळनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे पत्नी जयश्री पाटील यांनी मागील आठवड्यात अमळनेर शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यात मोठ्या संख्येने भगिनी उपस्थित झाल्या, परंतु हा मैत्रीचा सोहळा सर्व भगिनी सोबत व्हावा विशेष ज्यांना अतिशय दुर्लक्षित समजले जातात असे लैंगिक कामगार भगिनींसोबत व्हावा अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आणि खास हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जयश्री पाटील यांनी महिलांसोबत हीतगुज साधले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ भारती पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आधार संस्थेच्या रेणू प्रसाद होत्या. सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आराज सय्यद, अनिता बडगुजर, नंदिनी चौधरी, फरीदा काझी, संगीता मैलागीर, राकेश महाजन, कल्पना सूर्यवंशी, यास्मिन शेख, मुरलीधर बिराटी, तोसिफ शेख, दीप्ती गायकवाड, सुषमा विसपुते, ज्ञानेश्वरी पाटील, भावना सूर्यवंशी यांनी मेहनत घेतली.