डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवाच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले.

अमळनेर /प्रतिनिधि १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे अमळनेर मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या प्रवेशद्वारावर महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवाच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले.
अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलन समितीने व महिला ढोल पथकाने केलेल्या स्वागताने भारावून गेलेला असून अमळनेरचे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे ऐतिहासिक दृष्ट्या यशस्वी ठरेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.आर के नगर,धुळे रोड येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत नियोजित अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीतर्फे अभिनव पद्धतीने महिलांच्या ढोल पथकाद्वारे स्वागत करण्यात आले.यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा प्रतिमा परदेशी ,स्वागत अध्यक्ष श्याम पाटील,मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार,मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील,निमंत्रक रणजित शिंदे ,स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे,कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे महिला समन्वयक वैशाली शेवाळे यांनी संमेलन पत्रिका,व पुस्तक भेट देवून स्वागत केले.यावेळी मावळते अध्यक्ष जेष्ठ गांधीवादी लेखक डॉ.चंद्रकांत वानखेडे यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजन समितीचे शेकडो पदाधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.दरम्यान संमेलनाची संपूर्ण पूर्वतयारी झाली असून संमेलनाच्या पूर्वसंध्येलाच परिसरात मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिकांची गर्दी झालेली आहे.