शहानूर शाह मस्जिद येथे वक्फ बिलविरोधात काळी फीत बांधून जोरदार निषेध..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या निर्देशानुसार आज शहानूर शाह मस्जिद येथे जुम्मा नमाज नंतर वक्फ बिलाच्या विरोधात काळी फीत बांधून जोरदार निषेध करण्यात आला. शहरातील प्रमुख मुस्लिम समाजबांधवांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या निषेध आंदोलनात मस्जिदचे इमाम इरफान हजरत, मा. नगरसेवक मुख्तार खाटीक, फिरोज खा पठाण, इमरान खाटीक, गुलामनबी पहेलवान, आबीद अली सय्यद, आरिफ खा पठाण, बाबा शेख, अख्तर सय्यद, मोहम्मद साबीर, गुलाम मोहम्मद कुरेशी, शकील शेख (HDFC), मुन्ना शेख, सलमान शेख, अलीम खा पठाण, समीर पठाण यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वक्फ मालमत्तांवर होणाऱ्या हस्तक्षेपास विरोध दर्शवण्यासाठी काळी फीत बांधण्याचे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले होते.