१६ नोव्हेंबरलाच मी राजीनामा दिला.. मंत्री छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट: मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार

0

24 प्राईम न्यूज 4 फेब्र 2024. माझ्या भाषणांनी संतापून सरकारमधले,विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधील नेतेही बोलतात. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केला. मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार, असेही भुजबळ म्हणाले.

अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले की, ३६० कोटी रुपये देऊन खोटारेकॉर्ड केला जात आहे. नोंदीमध्ये खाडाखोड केली – जात आहे. सगेसोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. हायकोर्टाचा निकाल आहे. – त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटलंय, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली तर ओबीसींचे आरक्षण संपून जाईल, असे निकालात सांगितले आहे. खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. खोटे ■प्रमाणपत्र देऊन कुणबी दाखले देण्याचे प्रकार माझ्या हाती आले आहेत. – झुंडशाहीने असे कुणी आरक्षण घेतले तर त्याला कोर्टात आव्हान देता येईल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!