वर्षाची माडी नाही उत्तरलात मग दाढीपर्यंत कसे.. पोहचालमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल..

24 प्राईम न्यूज 8 फेब्र 2024
अडीच वर्षे वर्षाची माडी नाही उतरू शकले तर मग दाढीपर्यंत कसे पोहचाल, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी केला. कोकण दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांच्या दाढीला पकडून कुठूनही खेचून आणले असते, असे विधान केले होते. ठाकरेंच्या या विधानास मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. धाराशिव येथे शिवसंकल्प अभियानानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मिंध्यांच्या दाढीला खेचून आणले असते असे ते म्हणाले, मात्र या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत. या दाढीने तुमच्या सत्तेचे काय केले ते जगाला माहीत आहे, असे ते म्हणाले.