शिवशंभु प्रतिष्ठानची जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर..

पारोळा प्रतिनिधी/किशोर पाटील
छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून गाव तेथे शाखा व घर तेथे मावळा जोडण्याचे कार्य हाती घेतले आहे,त्याचाच एक भाग म्हणून जळगांव जिल्हा व पारोळा तालुका येथे कार्यकारणी जाहीर करण्यात आली.त्यात जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीराम भोई तर पारोळा तालुका कार्याध्यक्षपदी विजय चौधरी तसेच पारोळा तालुका संघटक राज चौधरी,शहर संघटक अक्षय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर नवनिर्वाचित सदस्यांच्या सामाजिक कार्य आणि शिवकार्याची दखल घेवुन वरील सर्व नियुक्त्या छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रविण मोरे,सचिव निलेश मराठे,राष्ट्रीय कार्यकारणी व जळगांव जिल्हाध्यक्ष विश्राम तेले, जिल्हाउपाध्यक्ष मोतीलाल सोनवणे यांनी केल्या आहेत. दरम्यान,छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडसंवर्धन,शिवकार्य,सामाजिक कार्य तसेच इतर उपक्रम हाती घेतले जात असुन पारोळा येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने साप्ताहिक शिवअभिषेक, स्मारक परिसरातील स्वच्छता व महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीसह विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.