टेम्पोचा धडकेत दुचाकीस्वार जखमी..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा येथील बायपासवर धरणगाव चौफुलीजवळ एका मालवाहतूक टेम्पोने दुचाकीस्वारास धडक दिल्याने त्यात दुचाकीस्वार गंभीर एक झाल्याची घटना घडली.
पारोळा बायपासवर धरणगाव चौफुलीजवळ शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास टेम्पो क्र एमएच ११ बीएल ३११२ ने दुचाकी क्र एमएच १९ इसी ५४४१ ला जोरात धडक दिली,त्यात सुनील राठोड वय २७ रा चिखलोड या तरुणास हातापायास लागून डोक्यास गंभीर दुखापत झाली,त्यास जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले,तेथे डॉक्टरांनी जखमीवर प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारार्थ धुळे येथे रवाना करण्यात आले.दरम्यान याबाबत पोलिसात उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.