पारोळा येथे शिवजयंती निमित्त नियोजन बैठक

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्या संदर्भात नियोजन बैठक सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी बैठकीत पोलिस व प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करण्यात यावे,शहरात सर्व रँली, शोभायात्रा,पालखी सोहळा, मिरवणूक ते एकसुत्र कार्यक्रम यावर आयोजकांनी आपसात सविस्तरपणे चर्चा करून नियोजन करावे असे ठराव मंजूर करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विकास सोनवणे,पत्रकार अभय पाटील, विशाल महाजन,महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ विनोद चौधरी,कार्याध्यक्ष गुलाब पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर,राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख जितेंद्र पाटील,राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष संजय बागडे, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे सचिव निलेश मराठे,शहर संघटक राज चौधरी,उमेश पाटील,निंबा मराठे,साई संस्थान चे जगन महाराज,सर्वज्ञ संस्थेचे अध्यक्ष अरूण जगताप,नवोतेज संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र सोनवणे,कंकराज येथील महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे चे कार्याध्यक्ष ललित पाटील,मेहू शाखेचे शाखाध्यक्ष रावसाहेब पाटील,पारोळा शहर संपर्क प्रमुख अनिल पाटील,सारवे येथील नितीन पाटील,राहुल पाटील, जयेश भोई,मोहन पारधी,सुभाष माळी यांचेसह शिवप्रेमी उपस्थित होते.