नेत्यांना फोडणे भाजपची युक्ती – प्रणिती शिंदे

24 प्राईम न्यूज 13 Feb 2024
राजकीय नेत्यांना फोडणे, ईडीसारख्या चौकशा लावणे, ही भाजपची युक्तीच आहे. माझ्याबाब- तही अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. आमच्याकडे ईडीची चौकशी होण्यासारखे काहीही नाही. अशोक चव्हाणांसोबत भाजपने माइंड गेम खेळला. ईडीच्या चौकशा आणि दबाव यामुळे अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला. अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आहे. चव्हाण साहेबांनी जो काही निर्णय भीतीपोटी घेतला असेल तो काँग्रेससाठी अतिशय दुर्दैवी आहे. या पद्धतीचे राजकारण आपल्या देशात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. पण भारताची नागरिक म्हणून ज्याच्यासाठी माझी जी तत्त्वे आहेत, ज्याच्यासाठी मी राजकार- णात आले, ती तत्त्वे यापुढेही पाळणार आहे, असे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.