आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी २५ वाहनांचा ताफासह सामील होणार.

अमळनेर/ प्रतिनिधी
अमळनेर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे १५ फेब्रुवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने अमळनेर तालुक्यातील शिवसैनिकांची १३ रोजी बैठक पार पडली. सुमारे २५ गाड्यांचा ताफा नेत दौऱ्यात सामील होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील, तालुका संघटक नितीन निळे, उपजिल्हा प्रमुख मनीषा परब, शहर प्रमुख सूरज परदेशी, उपतालुका प्रमुख चंद्रशेखर भावसार, शहर संघटक मोहन भोई, देवेंद्र देशमुख, जीवन पवार, दादा पवार, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.