मनोज जरांगेंची प्रकृती खालावली..

24 प्राईम न्यूज 15 Feb 2024. मराठा-कुणबी दाखले देताना सगेसोयरे संदर्भात काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करत मनोज जरांगे-पाटील मागील ५ दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. जरांगेंनी अन्नपाण्यासह औषधोपचाराचाही त्याग केला आहे. पोटात अन्नाचा कणही नसल्याने बुधवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली. नाकातून रक्तस्राव होऊनही ते उपचार घेण्यास तयार नव्हते. अखेर जरांगे यांच्यावर नियमित उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी उपोषणस्थळी जात जरांगे यांना जबरदस्तीने सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू केले. –मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका-मनोज जरांगे
झोपेत सलाईन लावले, सलाईन लावायचे असेल, तर आधी आरक्षणाची अंमलबजावणी कधी करता सांगा, असा प्रश्न उपस्थित करतानाच मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.