फडणवीस नाही फोडणवीस, अमित शहा घरफोडेउद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका.

24 प्राईम न्यूज 15 Feb 2024. आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जनतेने आता फोडणवीस असे ठेवले आहे. ते फडणवीस नाही तर फोडणवीस आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घरफोडे आहेत, यांच्या घरात काही निर्माण झाले नाही म्हणून ते दुसऱ्यांची घरे फोडतात. यांच्यापुढे काहीच आदर्शही नाही. मोदींचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कारण मोदींनाही कळले आहे की आपले स्वप्न हे भाजपवाले पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी उपऱ्यांना पक्षात घेतले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते बुधवारी अकोले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद मेळाव्यात बोलत होतेआपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण अवकाळी पावसासारखे भाजपमध्ये गेले. त्यामुळे त्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारी मिळाली. मोदींनी ज्यांना नावे ठेवली ते आता पवित्र झाले आहेत. आपल्याकडचा गद्दारही तिकडे गेलाय तो झोपा काढायला. हर्षवर्धन पाटलांना जशी शांत झोप लागते तसाच तो गद्दारही आहे. भाजपवाल्यांना आता काँग्रेसमधून आलेली घराणेशाही चालते, शिवसेनेतून आलेली घराणेशाही चालते, अजित पवार हेदेखील घराणेशाहीचेच प्रॉडक्ट आहेत. काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेली सगळी माणसे तुम्ही सोबत घेता आणि घराणेशाहीविरुद्ध बोंबलता.