प्रताप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप..

0

अमळनेर/ पिंपळे/प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रताप महावद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी शिबराचा (१० ते १६ फेब्रुवारी) चिमणपुरी पिंपळे येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याधयक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अशा शिबिरांमधून व्यक्तिमत्व विकास होतो आणि समाजाचा आपण एक अविभाज्य घटक असून आपण समाजाचे देणे लागतो त्यासाठी प्रत्येकान समाजाची सेवा करण्याचे तत्त्व अंगीकारले पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी.जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. या शिबिरात स्वयंसेवकांनी मतदार जनजागृती, प्लास्टिक मुक्त गाव, दंत चिकित्सा शिबिर, तसेच गावाची स्वच्छ्ता करण्यात आली. विद्यार्थ्यानी गावात प्रभातफेरी काढून बालविवाह प्रतिबंध, युवा पोर्टल नोंदणी तसेच गावातील नागरिकांना ई व्ही एम मशीन बाबत माहिती दिली. तसेच वरील विषयांवर पथनाट्य सादर करून गावकऱ्यांची मने जिंकून घेतली.
सदर सात दिवसाच्या शिबिरासाठी एकूण 125 विद्यार्थी उपस्थित होते. गावच्या सरपंच मा. सौ. वर्षाताई युवराज पाटील यांनी स्वतःचे राहते घर विद्यार्थिनींना निवासासाठी उपलब्ध करून दिले. या शिबिरासाठी दत्त मंदिर प्रतिष्ठान चे अध्यक्ष मां. श्री. निंबा दला चौधरी यांनी कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. या शिबिरासाठी रासेयो संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे , विभागीय समन्वयक प्रा. डॉ दिलीप गिरहे, मा. डॉ. दिनेश पाटील जिल्हा समन्वयक , अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर यांनी भेट देवून कार्यक्रमाची शोभा वाढवून अनमोल मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज पाटील
ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष बापू चौधरी, लोटन रूपचंद भिल, गोकुळ चुडामन पाटील, श्री. राजू देवचंद पाटील, सौ.कल्पना साहेबराव पाटील, सौ. मिनाताई सतीश पाटील, निंबा दयाराम चौधरी, श्री गोविंदा काशिनाथ चौधरी, श्री अरुण संभाजी पाटील, जयवंतराव पाटील ग्रामसेवक श्री किरण लंके,
तसेच अनेक गावकऱ्यांनी खूप सहकार्य केले. या समारोपाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले. तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. हेमंत पवार यांनी अहवाल वाचन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!